Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एम.डी. ड्रग्ससह एक जण अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एम.डी. ड्रग्ससह एक जण अटकेत १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - रवीश शर्मा  चंद्रपूर (दि. २६ एप्रिल २०२५) -         स्थानिक गुन्हे शाख...
एम.डी. ड्रग्ससह एक जण अटकेत
१.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - रवीश शर्मा 
चंद्रपूर (दि. २६ एप्रिल २०२५) -
        स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील इंदिरा नगर परिसरात कारवाई केली. या कारवाईदरम्यान, हनीफ करीम शेख (रहिवासी - इंदिरा नगर, रामनगर) यांच्या घरी पंचासमक्ष झडती घेण्यात आली. तपासात त्याच्याकडून ३३.०४ ग्रॅम एम.डी. (Mephedrone) ड्रग्स पावडर, अंदाजे १,६५,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३२३/२०२५, कलम ८ (क), २२ (ब) गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अमोल काचारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कामगिरीत सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनकडून सुरु आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top