पोलिसांची मोठी धडक कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ एप्रिल २०२५) -
दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे गोंडपिपरी हद्दीतील प्रकश्श बळीराम कोसारे (रा. गोंडपिपरी) यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूचे विविध ब्रँड (Mazaa, Eagle, Shisha Hookah) आढळून आले. एकूण ६६,९९५/- रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रकश्श बळीराम कोसारे यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७५ आणि अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३, ४, ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.