Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तंबाखूची अवैध वाहतूक करणारे दाम्पत्य अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तंबाखूची अवैध वाहतूक करणारे दाम्पत्य अटकेत 9.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 26 एप्रिल 2025) -        ...
तंबाखूची अवैध वाहतूक करणारे दाम्पत्य अटकेत
9.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 26 एप्रिल 2025) -
        दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी, स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदोरी टोल नाका येथे नाकाबंदी दरम्यान एक लाल रंगाची DATSUN कार क्र. MH34-B-8982 थांबवली असता कारमधील व्यक्तींची चौकशी केली असता, त्यांनी स्वतःची नावे मुकेश नगीनभाई कातरानी वय 46 वर्षे व राणी मुकेश कातरानी वय 40 वर्षे, दोन्ही रा. नेरी वार्ड, दुर्गापूर अशी सांगितली. पंचासमक्ष कारची झडती घेतली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू (Mazaa, Eagle, Shisha, Hola, Hookah) अंदाजे 2,67,600/- रुपये किंमतीचा आढळून आला. अधिक चौकशीत त्यांनी सांगितले की, हा तंबाखू ठक्कर (रा. दुर्गापूर) यांच्याकडे नेण्यात येत होता. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 223, 274, 275(3)(5) सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलम 30(2), 26(2)(ए), 3, 4, 59 (आय) आणि नियम व नियमावली 2011 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकूण 9,67,600/- रुपयांचा मुद्देमाल (तंबाखू व वाहन) जप्त करण्यात आला आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा दिलीप सुर, पोअं संदीप मुळे व विशाल राजुरकर यांच्या पथकाने केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top