Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पक्षात राहून काँग्रेससदृश वर्तन?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पक्षात राहून काँग्रेससदृश वर्तन? शोभा फडणवीस यांच्या विधानावरून नवा वाद कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपू...
पक्षात राहून काँग्रेससदृश वर्तन?
शोभा फडणवीस यांच्या विधानावरून नवा वाद
कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ एप्रिल २०२५) -
        (Bharatiya Janata Party Foundation Day) भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थापना दिनाच्या कार्यक्रमात माजी मंत्री शोभा फडणवीस (Former Minister Shobha Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "पक्ष संघटना मजबूत करा, आपल्या पक्षाची काँग्रेस झाल्यासारखे वागू नका" या त्यांच्या विधानामुळे अनेकांनी त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेकडे लक्ष वेधले आहे.

        शोभा फडणवीस यांच्यावर गेल्या पंधरा वर्षांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात काम केल्याचे आरोप कार्यकर्त्यांनी मांडले आहेत. विशेषतः सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे हे वाद अधिक तीव्र झाले आहेत. फडणवीस यांनी स्वतःच्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार न केल्याचे कार्यकर्ते दाखवत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान (Ballarpur Constituency) बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसचे संतोष रावत यांना मदत केल्याचे आरोपही फडणवीस यांच्यावर झाले आहेत. बँकेतील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात एसआयटी चौकशीपासून वाचवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे.

        शोभा फडणवीस यांनी (Hansraj Ahir) हंसराज अहिर व सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणुकीत कुठलाही सहभाग न दर्शविल्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. "वरवर प्रेमळ, पण आतून विषारी" अशी उपमा देत, कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर 'पुतना मावशी'सारखी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविरोधात भाजप नेतृत्व काय भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणाऱ्या वर्तनाला रोखले जाणार का, असा प्रश्न आता जाहीरपणे उपस्थित केला जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top