Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्रीराम नवमी निमित्त पालखी सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रीराम नवमी निमित्त पालखी सोहळा पंचमुखी नंदीगड देवस्थान हिरापूर चे आयोजन आमचा विदर्भ - अनंता गोखरे गडचांदूर (दि. ०७ एप्रिल २०२५) -         ...
श्रीराम नवमी निमित्त पालखी सोहळा
पंचमुखी नंदीगड देवस्थान हिरापूर चे आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
गडचांदूर (दि. ०७ एप्रिल २०२५) -
        श्रीराम नवमी निमित्त पंचमुखी नंदीगड देवस्थान, हिरापूर येथे उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुंदर सजवलेली दमनी पालखी, संत वामन बाबांचे मार्गदर्शन आणि विविध भजन मंडळींचा सहभाग. सकाळी पहाटे ४.१६ वाजता प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, श्री हनुमान व श्री साईबाबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा संत वामन बाबा यांच्या हस्ते विधिपूर्वक पार पडली. या पवित्र सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. यानंतर सकाळी १०.१६ वाजता पालखीने हिरापूर गावाच्या दिशेने प्रस्थान ठेवले. या वेळेस संपूर्ण हिरापूर नगरी ‘जय श्रीराम’ च्या गजराने दुमदुमून गेली होती. गावातील रस्त्यांवर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती व भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. या सोहळ्यात ११ हरिसुमन भजन मंडळींनी सहभाग घेत भक्तिगीतांद्वारे वातावरण भक्तिमय केले. दुपारी १.१६ वाजता प्रसिद्ध सप्त खंजरी वादक नयनपाल महाराज शिंदोलिकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून संपूर्ण भाविकवर्ग मंत्रमुग्ध झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचमुखी नंदीगड देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि सेवेकरी यांचे विशेष योगदान लाभले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top