Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; आरोपीला अटक आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. ५ एप्रिल २०२५) लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपासून एक...
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; आरोपीला अटक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ५ एप्रिल २०२५)
लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपासून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या एका युवकाला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष तुकाराम बारतीने (वय २५, रा. चंदनखेडा) असे आहे. पीडित तरुणी ही २०२१ साली कामानिमित्त भद्रावती येथे आली होती. त्याच काळात आशिष बारतीने तिला भेटून, तिला बाजारात सोडतो असे सांगत गवराळा परिसरात नेले आणि तिथे आपली प्रेमभावना व्यक्त केल्या.

तरुणीने नकार दिल्यानंतरही, "तुला गावाला सोडतो" असे म्हणत तिला भद्रावतीतील एका घरी नेले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तब्बल तीन वर्षे वेळोवेळी तिच्याशी संबंध ठेवत होता. मात्र, लग्नाचे केलेले आश्वासन खोटे ठरल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास भद्रावती पोलिसांकडून सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top