Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बोधगया महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूरात भव्य शांतता मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोधगया महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूरात भव्य शांतता मोर्चा वंचित महिला आघाडीचा ठाम पाठिंबा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २४ एप्...
बोधगया महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूरात भव्य शांतता मोर्चा
वंचित महिला आघाडीचा ठाम पाठिंबा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२५) -
        बोधगया महाबोधी महाविहाराच्या बौद्ध समाजाकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर शहरात 25 एप्रिल रोजी भव्य शांतता मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पुढाकाराने होणाऱ्या या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने ठाम पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा तनुजा रायपूर यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे जागतिक महत्त्वाचे स्थळ असूनही अद्याप बौद्धांच्या ताब्यात नाही, ही खेदजनक बाब आहे. 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करून बौद्धांना व ऐतिहासिक सत्याला न्याय मिळावा यासाठी भारतीय भिक्खू संघ 12 फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन करत आहे." शांततामय पद्धतीने लढा देत असलेल्या या आंदोलनास जगभरातून पाठिंबा मिळत आहे. चंद्रपूर शहरातील सर्व आंबेडकरी, बौद्ध, आणि मानवतावादी नागरिकांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन रायपूर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले. मोर्चा 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. पत्रकार परिषदेला मोनाली पाटील, इंदू डोंगरे, सुलभा चांदेकर, शोभा वाघमारे, कल्पना भासरकर, विश्रांत डोंगे, छाया वाघमारे, संदीप देव हे उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top