Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हिरापुरात भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हिरापुरात भीषण आग हिबिलाल शेख यांच्या 15 बकऱ्या जळून खाक आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२५) -         हिरापुर गावातील श...
हिरापुरात भीषण आग
हिबिलाल शेख यांच्या 15 बकऱ्या जळून खाक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२५) -
        हिरापुर गावातील शेतकरी हिबिलाल शेख यांच्या शेतात आज दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागून शेख कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत त्यांची संपूर्ण बकरीपालनाची व्यवस्था जळून खाक झाली असून, 15 बकऱ्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्या. बकरीपालन हा शेख कुटुंबाचा प्रमुख उपजीविकेचा आधार होता. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बकऱ्यांच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह होत असताना, या घटनेने त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे.

        आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग एवढी भयानक होती की सर्व बकऱ्या आगीत होरपळून गेल्या. शेख कुटुंबाला गावकऱ्यांनी धीर देत प्रशासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेख यांनी शासनाकडे व प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करताना सांगितले की, "आमच्या घराचे चूल फक्त बकऱ्यांमुळे पेटत होती. आता आमच्या डोळ्यासमोर संपूर्ण संसार जळून खाक झाला. शासनाने आम्हाला न्याय द्यावा."

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top