Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: २४ मे रोजीच्या रोजगार मेळाव्यासाठी मंत्रीमहोदयांची उपस्थिती निश्चित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२४ मे रोजीच्या रोजगार मेळाव्यासाठी मंत्रीमहोदयांची उपस्थिती निश्चित रोजगार मेळाव्यासाठी प्रेरणादायी पाऊल यहोवा यिरे फाउंडेशनचे आयोजन आमचा वि...
२४ मे रोजीच्या रोजगार मेळाव्यासाठी मंत्रीमहोदयांची उपस्थिती निश्चित
रोजगार मेळाव्यासाठी प्रेरणादायी पाऊल
यहोवा यिरे फाउंडेशनचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ एप्रिल २०२५) -
        दिनांक २४ मे रोजी चंद्रपूर येथे 'यहोवा यिरे फाउंडेशन'च्या वतीने भव्य "रोजगार व उद्योग प्रोत्साहन तसेच महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार" समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

        यहोवा यिरे फाऊंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे आणि पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार डी. के. आरीकर यांनी मा. मंत्र्यांना २४ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे आणि ७ जून रोजी राळेगाव, जि. यवतमाळ येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी अधिकृत निमंत्रण दिले. या निमंत्रण स्वीकृतीनंतर, अशोक उईके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. या रोजगार व उद्योग प्रोत्साहन मेळाव्यात अनेक नामवंत मार्गदर्शक व प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बोरकुटे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top