"तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी – कायदा केवळ सामान्यांसाठी?"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२५) -
राजकीय पदाचा वापर करून घराच्या शेजारील मालमत्तेवर बेकायदेशीर बांधकाम करत असल्याचा आणि तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप विवेक संतोषवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विवेक संतोषवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "आमच्या कुटुंबाच्या मालकीचे वडिलोपार्जित घर असून, त्यात दोन भावांची सध्या वास्तव्यास आहे. शेजारी असलेले बाबूराव संतोषवार यांचे पुत्र अनिल बाबूराव संतोषवार यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जुने घर पाडून नविन घराचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र हे बांधकाम त्याच्या मालकीच्या हद्दीत न करता आमच्या हद्दीत घुसून बेकायदेशीरपणे करण्यात येत आहे." बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचेही विवेक यांनी स्पष्ट केले. "घराचा घरटॅक्स आमच्या वडिलांच्या नावे असून, अनिलने मागील पाच वर्षांपासून घरटॅक्स भरलेला नाही," असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, अनिल संतोषवार हे माजी उपनगराध्यक्ष असून सध्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे पी.ए. म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून पोलिस व नगरपालिका प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला. "तक्रार दिल्यानंतर अनिलने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. माझी पत्नी आणि मलाही अपशब्द वापरून धमकावले. पोलिसांनाही फोन करून आमच्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न केला," असे संतोषवार यांनी नमूद केले. या सर्व प्रकरणी त्यांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी करून अनिल संतोषवारवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.