पहलगाम हल्ला: राजुरात संतापाची लाट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ एप्रिल २०२५) -
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच संतापाचा एक आवाज आज राजुरातूनही उमटला. राजुरा मॉर्निंग ग्रुप, बॅडमिंटन क्लब, व्यापारी असोसिएशन, नेहरू चौक ग्रुप व नागरिकांच्या वतीने आज सकाळी पंचायत समिती चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हल्ल्याच्या निषेधार्थ आणि दहशतवादाविरोधात घोषणा देत उपस्थित नागरिकांनी "भारत माता की जय" व "जय हिंद" अशा घोषणांनी संविधान चौक परिसर दणाणून टाकला. भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जहन्नुम पाठविण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमानंतर दोन मिनिटे मूक श्रद्धांजली देऊन शहीद पर्यटकाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी भारत सरकारने अशा दहशतवादी शक्तींना कठोर उत्तर द्यावे व भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक घनश्याम हिंगाणे, विनायक कल्लुरवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, दिनकर डोहे, छोटूलाल सोमवलकर, हरभजन सिंग भट्टी, हरजीत सिंग, रवी जामुनकर, अरुण मस्की, बंडू घुंगरे, अॅड. चांदेकर, मोहन चैनानी, नितीन पिपरे, राधेश्याम सोनी, संतोष पचारे, शंकर झंवर, कोंडावार, सिंग आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.