म्हाडा कॉलनीतील विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
म्हाडा कॉलनी नवीन चंद्रपूर परिसरात गरीब व गरजूंकरिता १० हजार घरे उभारण्याच्या प्रस्तावावर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी रेल्वे अतिक्रमणधारकांना तातडीने घरे उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. यासंदर्भात १०० घरे तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पुढील पाच वर्षांत पूर्ण पुनर्वसनाचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. विशेष बाब म्हणजे, या प्रकल्पासंदर्भात पुढील बैठक थेट केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्या समवेत घेण्यात येणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.
याशिवाय, म्हाडा कॉलनीत महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव, क्रीडांगण उभारणी, भूमिगत नाले आणि रस्ते विकासाच्या कामांचीही तातडीने गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्व प्रस्तावांबाबत म्हाडा विभाग सकारात्मक असल्याचे मंत्री संजीव जयस्वाल यांनी सांगितले. या बैठकीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांचीही उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.