Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "गडचांदूरच्या युवकांनी राष्ट्रीय पातळीवर दाखवला आपला खेळाचा झंझावात!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"गडचांदूरच्या युवकांनी राष्ट्रीय पातळीवर दाखवला आपला खेळाचा झंझावात! गडचांदूरच्या महाराष्ट्र वॉरियर्स व्हॉलीबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्ध...
"गडचांदूरच्या युवकांनी राष्ट्रीय पातळीवर दाखवला आपला खेळाचा झंझावात!
गडचांदूरच्या महाराष्ट्र वॉरियर्स व्हॉलीबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेत विजयी घोडदौड
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        येथील महाराष्ट्र वॉरियर्स व्हॉलीबॉल संघाने भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत गोवा येथे आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवेश मिळविला. या राष्ट्रीय स्पर्धेत संघाने उल्लेखनीय यश संपादन करत गडचांदूर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.​ संघाच्या या घवघवीत यशाबद्दल आमदार देवराव भोंगळे यांने संघाचा पुष्पगुच्छ आणि 5 हजार रुपये देऊन सत्कार केला.

        महाराष्ट्र वॉरियर्स संघात आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलचे विद्यार्थी निमिष उद्धव पुरी, नैतिक नितीन कल्लेवार, सुशांत संपत रापोलु, कृणाल बाबुराव लांजे, अतुल नंदलाल चौधरी, आर्यन संजय कुलमेथे, मंथन श्रीकांत चिव्हाने, अनिरुद्ध नवनाथ मंदे, साकिब कुरेशी, हर्षित संकल्प बोबडे, प्रीत मंदे यांचा समावेश आहे.​ संघाच्या या यशाबद्दल भाजपचे शहराध्यक्ष अरुण डोहे, सतीश उपलेंचवार, उद्धव पुरी, डॉ. सुभाष चुन्ने, व्यापारी असोसिएशन आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. गडचांदूर शहराच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top