Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात भाजप संघटनासाठी एकत्रित शक्तीप्रदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यात भाजप संघटनासाठी एकत्रित शक्तीप्रदर्शन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बैठक संपन्न आमचा विदर्भ - रवीश शर्मा चंद्रपूर (दि. २७ एप्...
कोरपना तालुक्यात भाजप संघटनासाठी एकत्रित शक्तीप्रदर्शन
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बैठक संपन्न
आमचा विदर्भ - रवीश शर्मा
चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        कोरपना तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने भव्य बैठकीचे आयोजन विश्रामगृह येथे करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी भूषविले.

        बैठकीत हंसराज अहिर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "कोरपना तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे आम्ही खासदारकी चार वेळा आणि आमदारकी तीन वेळा जिंकली आहे. त्यामुळे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकनिष्ठपणे काम करावे," असे आवाहन केले.

        बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार संजय धोटे, मा. आमदार सुदर्शन निमकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष राजू घरोटे, भाजप माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे संचालन तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले व आभार प्रदर्शन निलेश ताजने यांनी मानले. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठी उपस्थिती या बैठकीत पाहायला मिळाली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top