Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सातत्याने केलेले परिश्रम यशाचे दारे उघडतात - अनिकेत हिरडे (IPS)
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सातत्याने केलेले परिश्रम यशाचे दारे उघडतात - अनिकेत हिरडे (IPS) महियर गुंडेविया अभ्यासिकेत 'स्पर्धा परीक्षा' विषयावर मार्गदर्शन सत्र...
सातत्याने केलेले परिश्रम यशाचे दारे उघडतात - अनिकेत हिरडे (IPS)
महियर गुंडेविया अभ्यासिकेत 'स्पर्धा परीक्षा' विषयावर मार्गदर्शन सत्र
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले
राजुरा (दि. २६ एप्रिल २०२५) -
        विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून, अपयशाचा सामना करताना त्यातून बोध घेऊन पुढे प्रयत्नशील राहिले पाहिजे. सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन येथील आयपीएस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी केले. राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने महियर गुंडेविया अभ्यासिकेच्या विद्यार्थीनींसाठी आयोजित "स्पर्धा परीक्षांची आव्हाने" या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात ते प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून समृद्धी सहकारी बँकेचे अध्यक्ष सर्वानंद वाघमारे, सचिव मसूद अहमद, पत्रकार संघाचे सचिव व जेष्ठ पत्रकार अनिल बाळसराफ व एम.के. सेलोटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात आयपीएस अनिकेत हिरडे आणि अविनाश जाधव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

        आपल्या मार्गदर्शनात अनिकेत हिरडे म्हणाले, "स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्येक वेळेस गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार घडत नाहीत. मात्र ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ध्येयपूर्ती शक्य होते." युपीएससी परीक्षेचा स्वअनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थिनींना अपयशातून धडा घेण्याचे आणि चुकांपासून शिकण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

        अविनाश जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श ठेवून संस्थेने अभ्यासिकेच्या सर्व गरजांसाठी मदतीस तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बाळसराफ यांनी केले, सूत्रसंचालन कु. अनुष्का बनसोड यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु. ईशिका लोखंडे यांनी व्यक्त केले.

        या कार्यक्रमात शितल बनसोड, निशा मोहुर्ले, रोशनी टेकाम, स्नेहा जानवे, पायल कुंदलवार, प्रियंका धुर्वे, स्नेहा हंसकर, जास्मीन शेख, पूजा महाकुलकर, वैष्णवी टेकाम, दुर्गा शेंडे, किरण वाढई, दिक्षा भोयर, संपदा रच्चावार, प्रणाली चिंचोलकर, पल्लवी वेलके, अमिषा मोरे, पायल मडावी, दिक्षा येमुलवार यांच्यासह अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top