National interest supreme
राष्ट्रहित सर्वोच्च ; थेट प्रक्षेपणावर बंदी
सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अॅडव्हायजरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली (दि. २६ एप्रिल २०२५) -
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे केंद्र सरकारने सर्व मीडिया चॅनेल्ससाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे निर्देश जारी केले आहेत. अॅडव्हायजरीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संरक्षण कारवायांचे आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण (Live Coverage) करणे टाळावे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सर्व मीडिया संस्थांनी जबाबदारीने व काळजीपूर्वक वृत्तांकन करावे, असे सांगण्यात आले आहे.
यात पुढील आठ महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत -
- संरक्षण कारवायांचा किंवा सुरक्षा दलांच्या हालचालींचा रिअल-टाईम कव्हरेज न करणे.
- 'सूत्रांवर आधारित माहिती' देखील सार्वजनिक करणे टाळावे.
- कोणतीही संवेदनशील माहिती लवकर प्रसिद्ध केल्यास शत्रु देशांना मदत मिळू शकते आणि ऑपरेशन्सची गुप्तता धोक्यात येऊ शकते.
- कारगिल युद्ध, 26/11 मुंबई हल्ला आणि कंधार अपहरणासारख्या प्रसंगातून मिळालेल्या धड्यांवरून जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
- मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना आधीच केबल टेलिव्हिजन नेटवर्क (सुधारण) नियम, 2021 अंतर्गत 6(1)(p) नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते, ज्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही थेट कव्हरेजवर निर्बंध घातले आहेत.
ही अॅडव्हायजरी मंत्रालयातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर जारी करण्यात आली आहे आणि सर्व मीडिया हाऊसेस व सोशल मीडिया युजर्सना राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी अत्यंत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.