पोलीस असल्याचे भासवून तरुणावर हल्ला
आमचा विदर्भ - अनिल पांडेय
बल्लारपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
बल्लारपूर शहरात तीन इसमांनी पोलीस असल्याचे सांगून एका तरुणाला अंधारात नेऊन जबर मारहाण केली व त्याच्याकडील सोन्याची अंगठी व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी संतोष नरसय्या उपटलावार वय ३२ वर्षे, रा. वरूर, ता. राजुरा हा बल्लारपूर बस स्टॅण्डवर थांबला असताना, तीन अज्ञात इसम त्याच्याजवळ आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून त्याला दुचाकीवर बसवले आणि संत तुकाराम हॉलच्या दिशेने घेऊन गेले. तेथे नेऊन फिर्यादीला मारहाण करत त्याच्या खिशातील ३०० रुपये आणि सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व आरोपींनी पळ काढला.
संतोष उपटलावार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षकांनी तात्काळ गुन्हे शोध पथक तयार करून तपास सुरु केला. गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपी हितेश सुधाकर साखरे वय ३५ वर्षे, शाहरूख शेरखान पठाण वय २९ वर्षे, पप्पू उर्फ अजगर मोहन गायकवाड वय २८ वर्षे सर्व आरोपी रविंद्र नगर वॉर्ड, बल्लारपूर याना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास बल्लारपूर पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.