Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूरचा आदर्श मिश्रा यांची जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत कामगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूरचा आदर्श मिश्रा यांची जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत कामगिरी ९८% गुण मिळवून तालुक्याचे नाव उज्ज्वल आमचा विदर्भ - अनिल पांडेय बल्लारपूर ...
बल्लारपूरचा आदर्श मिश्रा यांची जेईई मेन्स परीक्षेत घवघवीत कामगिरी
९८% गुण मिळवून तालुक्याचे नाव उज्ज्वल
आमचा विदर्भ - अनिल पांडेय
बल्लारपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        बल्लारपूर येथील गोरक्षण वॉर्डातील आदर्श सतीश मिश्रा यांनी नुकत्याच झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत ९८% गुण मिळवून आपला व तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. आदर्शने भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या विषयांमध्ये ९९% गुण मिळवून विशेष कामगिरी बजावली आहे. आदर्श सध्या माउंट सायन्स कॉलेज, बल्लारपूर येथे शिक्षण घेत असून, नागपूर येथे कोचिंग करतो. याआधीही आदर्शने दोन वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत दिलासा ग्राम स्कूल मधून टॉप केले होते. त्याच्या सातत्याने दाखवलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीने तो एक आदर्श विद्यार्थी ठरला आहे.

        आदर्शचे वडील बामणी येथील प्रोटीन फॅक्टरीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. आदर्श हा सध्या नीट (NEET) परीक्षेचीही तयारी करत आहे आणि पुढील आठवड्यात त्याची नीट परीक्षा होणार आहे. जेईई मेन्स परीक्षेत मिळवलेल्या यशाने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल आदर्शचे आई-वडील, बहीण तसेच ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते अजय दुबे, अनिल पांडे, मिथिलेश पांडे, श्रीकांत उपाध्याय, आनंद तिवारी, नागमणि मिश्रा आदींनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top