Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भंगार चोरांची टोळी उघडकीस, ५.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भंगार चोरांची टोळी उघडकीस, ५.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त चोरीचे लोखंडी चॅनल व वाहने जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२...
भंगार चोरांची टोळी उघडकीस, ५.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोरीचे लोखंडी चॅनल व वाहने जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        चंद्रपूर शहरात भंगार चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत चोरी गेलेला ५ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत. २३ एप्रिल २०२५ रोजी रवींद्र विश्वनाथ चहारे रा. पठाणपुरा वार्ड यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मते, सिव्हिल लाईन, पटवारी ऑफिस परिसरात सुरू असलेल्या रोड बांधकामासाठी ठेवलेले ३१ नग लोखंडी चॅनल सेंट्रींग प्लेट्स अज्ञात व्यक्तींनी चोरी केले होते.

        या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. २७ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून, गोल बाजार व तिलक मैदान, चंद्रपूर येथून चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेला लोखंडी माल, एक ई-रिक्शा व मोपेड असा एकूण ५ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी हर्षद कालीदास मेश्राम वय २४ वर्षे, धनराज सुधार लोणारे वय ३० वर्षे, आशीष भगवाना आल्लेवार वय २४ वर्षे, अमन अजीच शेख वय ३८ वर्षे याना अटक केली आहे. 

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनिल गौरकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांचा समावेश होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top