Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "आखीव पत्रिकेसाठी लढा तीव्र होणार!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"आखीव पत्रिकेसाठी लढा तीव्र होणार!" भद्रावती गावठाण मोजणीच्या मागणीस शिवसेना महिला आघाडीचा इशारा ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना...
"आखीव पत्रिकेसाठी लढा तीव्र होणार!"
भद्रावती गावठाण मोजणीच्या मागणीस शिवसेना महिला आघाडीचा इशारा
ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना मालकी हक्काचे दस्तऐवज द्यावेत, अन्यथा आंदोलन - सौ. मिनलताई आत्राम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ एप्रिल २०२५) -
        भद्रावती शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे अचूक मोजणी करून नागरिकांना आखीव पत्रिका (मिळकत पत्रिका) देण्याची मागणी करत शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा प्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक विविध सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत, असे त्या म्हणाल्या.

सिटी सर्व्हेचा गोंधळ – नागरिकांवर अन्याय
        गावठाण परिसरातील नागरिक गेली अनेक दशके त्या भूखंडावर राहत असूनही त्यांच्या नावावर मालकी हक्काचे कुठलेही अधिकृत कागदपत्र नाही. यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, जातीचे दाखले, कर्ज योजना यांचा लाभ घेणे अशक्य झाले आहे. विशेषतः गवराळा वार्ड आणि इतर ९ वार्डमध्ये ही समस्या जास्त तीव्र आहे.

ड्रोन मोजणीची प्रतीक्षा – अधिकार मिळविण्याचा लढा
        केंद्र सरकारच्या "स्वामित्व योजने" अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणी करून नागरिकांना मिळकत पत्रिका दिली जाणार होती. ही प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असून यातून नागरी हक्काचे संरक्षण होणार आहे. मात्र आर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील जनरल मॅनेजर यांच्या विरोधामुळे भद्रावती गावठाणाची मोजणी सुरूच होऊ शकलेली नाही.

आता नाही तर आंदोलन!
        या मुद्द्यावर सौ. मिनलताई आत्राम यांनी जिल्हा अधीक्षक, भू-अभिलेख चंद्रपूर आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची आखीव पत्रिका द्यावी, अन्यथा शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top