State Level Children's Scientific Science Exhibition
ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते सुनेशी विनोद भोंगळे हिचा सत्कार
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -
अमरावती येथे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या 52 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीमध्ये उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ या गटातून सर्वाधिक गुण मिळवत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पंचाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कुमारी सुनेंशी विनोद भोंगळे हिने प्रथम क्रमांकाचे चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. या विज्ञान प्रदर्शनीत हिने "इको फ्रेंडली बायोडीग्रेडेबल पॉट्स" या प्रतिकृतीच्या सादरीकरणासाठी विशेष सत्कार करण्यात आला. क्षेत्र कोणतेही असो त्यांच्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या आवडीनिवडी प्रमाणे योगदान देऊन जीवनात यशस्वी होण्याचे काटेकोर प्रयत्न करावे. या प्रसंगी तिचे व तिच्या कुटुंबासह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या घवघवीत यशाकरीता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप देठे, कपिल इद्दे, मधुकर चिंचोलकर, अमोल देवाळकर, सौरभ मादासवार तसेच गावातील पदाधिकारी गजानन चोथाले, बापुजी वांढरे, विनायक सोयाम, केशव जीवतोडे, देवराव चंदनखेडे, घनश्यान चोथले, विनोद भोंगळे, गजानन बोबडे, किशोर वडस्कर, अमोल देवाळकर, हरी देठे, भास्कर वडस्कर, आशिष आकनुरवार, नितीन भोंगळे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.