Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Bhajan Seva Award ; राजुऱ्याचे बळीराम बोबडे यांना श्रीगुरुदेव उत्कृष्ठ भजन सेवा पुरस्कार जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Bhajan Seva Award राजुऱ्याचे बळीराम बोबडे यांना श्रीगुरुदेव उत्कृष्ठ भजन सेवा पुरस्कार जाहीर "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृ...
Bhajan Seva Award
राजुऱ्याचे बळीराम बोबडे यांना श्रीगुरुदेव उत्कृष्ठ भजन सेवा पुरस्कार जाहीर
"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन सांगडी येथे सन्मानित होणार"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे, प्रतिनिधी
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -    
        दिवंगत सदारामजी पारधी स्मृती श्रीगुरुदेव उत्कृष्ठ भजन सेवा पुरस्कार बळीराम बोबडे यांना जाहीर झाला आहे. बळीराम बोबडे हे वेकोलि मधून सेवानिवृत्त झाले आहेत, ते जवाहरनगर येथे अनेक वर्षांपासून श्रीकृपा गुरुदेव सेवा मंडळाचे सामुदायिक ध्यान-प्रार्थणा, भजन, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. राजुरा तालूक्याचे भजन प्रमुख म्हणून अनेक शाखांमध्ये श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार व प्रसार कार्यात ते सक्रियपणे महत्वाची भुभिका बजावित आहेत. त्यांचे अविरत भजनसेवा कार्याची दखल घेवून राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रिय समीतीने त्यांची उत्कृष्ठ भजनसेवा पुरस्कार करीता निवड एकमताने केली आहे. त्यांना येत्या 6 व 7 मार्च 2025 रोजी होणाऱ्या सांगडी, मंडल बेला, जि. आदिलाबाद येथील संमेलनात मान्यवरांचे हस्ते श्रीगुरुदेव उत्कृष्ठ भजनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे निवडीबद्दल स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे, संजय तिळसमृतकर, शिवाजी भेदोडकर, ॲड.राजेंद्र जेनेकर, लटारु मत्ते, शशिकला बोबडे, मधूकर भगत, प्रल्हाद उईके, श्रीहरी ठमके, उद्धवराव झाडे, शकुंतला दवंडे, हुकूमचंद पठाडे, लता ठमके, सुनिल पदमगिरवार, रमेश गौरकर, रत्नाकर नक्कावार, मनोहरराव बोबडे, सुभाष पावडे, सुनिल बोबडे, प्रमोद चोखारे, राहुल कुटेमाटे, गजेंद्र ढवस आदींनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top