Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Aquaculture and Skincare Producers अखेर, त्या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Aquaculture and Skincare Producers अखेर, त्या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू मत्स्यपालन व सिंगाडा उत्पादकांची अनेक वर्षाची इच्छापूर्ती आमचा व...
Aquaculture and Skincare Producers
अखेर, त्या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू
मत्स्यपालन व सिंगाडा उत्पादकांची अनेक वर्षाची इच्छापूर्ती
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -    
        राजुरा तालुक्यातील बामनवाडा तलावाच्या खोलीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कृपेमुळे का होईना सुरू झाल्याने याठीकाणी मत्स्यपालन व सिंगाडा शेती करून उपजिवीका करणाऱ्या मच्छीमार बांधवांत उत्साहाचे वातावरण दिसून येत असून त्यांची अनेक वर्षाची इच्छापूर्ती झाली आहे. बामनवाडा येथील तलावात मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन व सिंगाडा शेती येथील मच्छींद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या मार्फत केली जात होती. परंतू या तलावात पसरलेल्या इकोर्निया सदृष्य वनस्पतीमुळे या व्यवसायावर अवकळा पसरलेली होती. अनेक वर्षापासून या तलावाच्या खोलीकरणाची मागणी संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक लोकप्रतिनीधी च्या मार्फत केली जात होती परंतू त्याकडे प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत होते. संस्थेच्या सदस्यांनी अनेक वेळा इकोर्निया वनस्पती तलावातुन काढण्याचा प्रयत्न केला परंतू ते शक्य झाले नाही. त्यामुळे या तलावात मत्स्यपालन व सिंगाडा शेती करणे अत्यंत कठीण होऊन मच्छीमार बांधव मोठ्या अडचणीत सापडला होता. सिंगाडा शेती ही शेती किंवा बागायत शेती वर्गात मोडत नसल्यामुळे कृषी विभागाकडून आथिक मदत किंवा कोणताही निधी उपलबध होत नसल्याने लोप पावत चाललेली सिंगाडा शेती दुर्लक्षीत झालेली होती परंतू या तलावाच्या खोणीकरणामुळे मात्र मत्स्यपालनासोबतच सिंगाडा शेती सुद्धा होणार असल्याने मच्छीमार बांधवात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाचे आभारही मानले आहे. 

अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वाकडे
या तलावाच्या खोलीकरणाकरीता मच्छींद्र मत्स्यपालन संस्थेच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात शासन व प्रशासनाकडे मागील अनेक वर्षापासून मागणी केली जात होती. सध्या राजुरा परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता आवश्यक असलेली माती परिसरात असलेल्या तलावाचे खोलीकरण करून माती-मुरूमाचा वापर करावा अशी मागणी सुद्धा माजी आमदार निमकरांनी केल्यानुसार तालुक्यातील पाच तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू झाले आहे. 

        संस्थेचे सदस्य मत्स्यपालन व सिंगाडा शेती करण्यासाठी उत्साही आहेत परंतू तलावांच्या वाईट अवस्थेमुळे त्यांच्यात अनास्था दिसून येत होती. बामनवाडा व इतर तलावाच्या खोलकरणामुळे नक्कीच नवी उर्जा निर्माण होऊन व्यवसायात वृद्धी होईल.
रतन पचारे
अध्यक्ष मच्छींद्र मत्स्यपालन संस्था, राजुरा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top