Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Cricket tournament ; खेळाडूंनो आपल्या क्षेत्रात पुढे जा, सदैव तुमच्या पाठीशी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Cricket tournament ; खेळाडूंनो आपल्या क्षेत्रात पुढे जा, सदैव तुमच्या पाठीशी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंना दिली ग्वाही सुधीरभाऊ मुनगंटी...
Cricket tournament ;
खेळाडूंनो आपल्या क्षेत्रात पुढे जा, सदैव तुमच्या पाठीशी
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंना दिली ग्वाही
सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ क्लब द्वारा आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०२ मार्च २०२५) -    
        चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू तसेच तरुण, तरुणी कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नयेत यासाठी त्यांच्याकरिता विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. खेळाडूंच्या प्रगतीसाठी स्टेडियम तसेच क्रिडांगणांचा विकास करण्यात आलेला आहे. खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात पुढे जावे, मी सदैव तुमच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंना दिली. 

        बल्लारपूर येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ क्लब द्वारा आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, काशीनाथ सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, ॲड. रणंजय सिंग, नरेंद्रसिंग दारी, श्रीनिवास जंगम, अथर्व तन्नीरवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, तिवारी सर, राजेश्वर सुरावार, रेणुकाताई दुधे, वैशालीताई जोशी आणि भाजपा पदाधिकारी, खेळाडू आदींची उपस्थिती होती.

        देशाच्या क्रिकेट संघात बल्लारपूरातील खेळाडू खेळावेत, अशी अपेक्षाही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,  बल्लारपूर कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. मुंबईतील खेळाडूंपेक्षा आपले खेळाडू कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात आपले मुले पुढे जावेत यासाठी शिक्षण क्षेत्रात मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, देशातील एसएनडीटी विद्यापीठ, सैनिक शाळा, मूल मध्ये येणारे पॉलिटेक्निक कॉलेज या बाबतीत विकास होत आहे. यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे खेळाला प्रोत्साहन देत आहेत. त्यादृष्टीने बल्लारपूरातही खेळाचा विकास व्हावा यासाठी १ कोटी ७९ लाख रुपये खर्च करुन मैदान विकसीत करण्यात आले. 

        आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा विसापुर येथील स्टेडियमवर झाल्या. या स्टेडियमचे सर्व स्तरातून कौतूक झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षाताई खडसे उपस्थित होत्या. त्यांनी येथील स्टेडियमचे विशेष कौतुक केले. पुणे नंतर आपले बॅडमिंटन कोर्ट सर्वोत्तम, स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. विसापूर येथील स्टेडियमध्ये धनुर्विद्याकरिता सुविधा निर्माण होत आहेत. मिशन शौर्यच्या माध्यमातून आपले मुले एव्हरेस्ट चढले. अशा स्पर्धांच्या माध्यमातून लक्ष्य प्राप्त करण्याचे मार्ग निर्माण करायचे आहेत. मिशन ऑलिम्पिक २०३६ सुरु करण्यात आले आहे. मात्र यात आर्थिक अडचणी येत असलेल्या खेळाडूंसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. २०३६ मध्ये ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरमधील युवक, युवती पदक नक्की प्राप्त करतील, असा विश्वासही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

        इनडोअर आंतरराष्ट्रीय स्टेडियम १६ एकर जमिनीवर साकारले जात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम असेल. १० बॅडमिंटन कोर्ट असेल, व्हॉलिबॉल मैदान राहतील. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होतील, अशा स्वरुपाचे हे इनडोअर स्टेडियम असेल, असेही आ.मुनगंटीवार म्हणाले. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरील १९ वर्षाखालील खेळाडूंची स्पर्धा घेतली. या स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करण्यासाठी केरळ येथील खेळाडूंच्या पालकांनी फोन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने मुलींसाठी कौशल्य विकास केंद्र सुरु केले. फ्लाईंग क्लब सुरु करण्यात आले असून प्रशिक्षणासाठी फक्त २ लक्ष रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, युवतींच्या विकासासाठी सदैव तत्पर असून तरुणांनो आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

        न्यू टारगेट क्रिकेट क्लब बल्लारपूर संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला १ लक्ष रुपये प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आले. रिवेंज क्रिकेट क्लब दुर्गापूर संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संघाला ५१ हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. राईस सिटी क्रिकेट क्लब मुल संघाने ३१ हजार रुपये तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

        मॅन ऑफ द सिरीज श्री. रवी मंडल बल्लारपूर, बेस्ट बॉलर श्री. सुभाष येडमे दुर्गापुर, उत्कृष्ट फलंदाज श्री. दीपक सौदागर बल्लारपूर, सर्वाधिक झेल श्री. जावेद खान दुर्गापुर, उत्कृष्ट खेळाडू अंतेय शेंडे पोंभुर्णा आणि अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू श्री. जतीन वर्मा बल्लारपूर यांनी विशेष पुरस्कार पटकाविले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top