Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Marathi Language Day राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Marathi Language Day राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -      ...
Marathi Language Day
राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -
        महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पब्लिक स्कूल बामणवाडा येथे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक मोहम्मद महम्मद मुसा तसेच संचालक नदीम शेख व शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभ्यास क्रमातील विविध मराठी कविता, कुसुमाग्रज यांच्या जीवनावर भाषणे तसेच नृत्य देखील सादर केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. (rashtriya Public School) 

        मराठी भाषेचा गौरव आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. असे यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक महमूद मुसा म्हणाले. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक नदीम शेख म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजे, या दिवशी प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असतो. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सिमरन मॅडम यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top