Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विदर्भातील आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Farmer Idol Agriculture Graduate Idol विदर्भातील आदर्श शेतकऱ्यांचा गौरव श्रीमती विमलादेवी वाघूजी गेडाम "शेतकरी आयडॉल" तर डॉ.मोहन ...
Farmer Idol Agriculture Graduate Idol
विदर्भातील आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
श्रीमती विमलादेवी वाघूजी गेडाम "शेतकरी आयडॉल" तर डॉ.मोहन बेलगमवार "कृषी पदवीधर आयडॉल"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपुर (दि. ०३ मार्च २०२५) -
        डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आणि इतर समांतर संस्थांच्या सहकार्यातून स्वतः व्यावसायिक शेती यशस्वीपणे साकारत असलेल्या आणि इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या विदर्भातील शेतकरी बांधवांचा कार्यपरिचय समाजासमोर आणण्यासाठी (Farmer Idol) "शेतकरी आयडॉल" हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर या प्रेरणादायी शेतकऱ्यांची ओळख करून देणारी होर्डिंग्ज जानेवारी 2025 पासून झळकत आहेत.

       प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी बंधू-भगिनींसोबतच कृषी अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचा व्यावसायिक उपयोग करणाऱ्या कृषी पदवीधर युवक-युवतींना देखील प्रोत्साहित करण्यासाठी (Agriculture Graduate Idol) "कृषी पदवीधर आयडॉल" हा उपक्रम राबविला जात आहे. "आधी केले मग सांगितले" या तत्त्वाचा अवलंब करून शास्त्रीय दृष्टिकोनातून परिपूर्ण व्यावसायिक शेती करणारे आणि इतरांना मार्गदर्शन करणारे कृषी उद्योजक, निर्माते, आणि रोजगार देणारे युवा कृषी पदवीधर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंगच्या माध्यमातून झळकत आहेत. विदर्भातील कृषि विज्ञान केंद्रे आणि तत्सम संस्थांच्या सहयोगातून प्रत्येक दोन महिन्यांसाठी एका "शेतकरी आयडॉल" आणि "कृषी पदवीधर आयडॉल" यांची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.

मार्च-एप्रिल 2025 साठी निवडलेले आयडॉल:
श्रीमती विमलादेवी वाघूजी गेडाम "शेतकरी आयडॉल" तर डॉ. मोहन बेलगमवार "कृषी पदवीधर आयडॉल" त्यांचे कार्यपरिचय देणारी होर्डिंग्ज संपूर्ण विदर्भभर स्थापित करण्यात आली आहेत, जे इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहेत. (Mrs. Vimaladevi Waghuji Gedam is the "Farmer Idol" and Dr. Mohan Belgamwar is the "Agricultural Graduate Idol")

प्रयोगशील शेतकरी आणि कृषी पदवीधरांना व्यावसायिक शेतीसाठी प्रेरणा
        विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी तसेच शेतीला समर्पित कृषी पदवीधर यांच्या कार्यपरिचयातून इतर शेतकरी बंधू-भगिनी आणि कृषी पदवीधरांना व्यावसायिक शेतीची प्रेरणा मिळावी, त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीकडे वळावे आणि यातूनच शाश्वत ग्रामविकास साध्य व्हावा, ही विद्यापीठाची मुख्य भावना आहे.

विदर्भातील अशा शेतकरी बांधवांसाठी विशेष आवाहन:
        विदर्भातील शेतकरी बंधू-भगिनींनी, ज्यांनी स्वतः शेती करताना इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले आहे आणि (Agricultural University) कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा यशस्वी अवलंब केला आहे, त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याशी संपर्क साधावा.
  • तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांना मिळावा.
  • तुमच्या कार्याची नोंद घेऊन तुम्हालाही ‘आयडॉल’ म्हणून सन्मानित करता येईल.
या संधीचा लाभ घ्या आणि विदर्भातील कृषी परिवर्तनाचा भाग बना! असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे. (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top