Yoga and balanced diet
मुलांना स्क्रीन टाईम व जंक फूडपासून दूर ठेवा – डॉ. सुप्रिया बोबडे
योग व संतुलित आहार - निरोगी जीवनासाठी काळाची गरज
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०३ मार्च २०२५) -
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांमध्ये स्क्रीन टाईम वाढला असून जंक फूडकडे त्यांचा कल वाढत आहे. याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येत आहेत. तसेच, महिलांनी रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःचीही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. सुप्रिया बोबडे यांनी केले. त्या पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात त्या मार्गदर्शन करीत होत्या.
महिलांचे आरोग्य आणि जीवनशैलीतील महत्त्वाचे बदल
- बालपण, तारुण्य, प्रौढावस्था – या कालखंडात महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि संभाव्य आजार याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले.
- नियमित योगासने आणि ध्यान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुदृढ राहते.
- आहार नियंत्रणाची आवश्यकता – संतुलित आहार घेताना पालेभाज्यांचा अधिकाधिक समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांच्या समस्या आणि त्यावरील मार्गदर्शन
- कार्यक्रमादरम्यान महिलांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक उराडे, तालुका प्रभारी मुखरू सेलोटे, प्राध्यापक दत्तात्रय मोरे, प्राध्यापक हरिभाऊ डोरलीकर, प्रभाकर चन्ने, अरुण जमदाडे, आनंद चलाख, महामंत्री भावनाताई भोयर, सोनल चीडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संचालन तालुका प्रभारी मुखरू सेलोटे यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक उराडे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.