Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: National Science Day राष्ट्रीय पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
National Science Day राष्ट्रीय पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा ...
National Science Day
राष्ट्रीय पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -
        विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याकरिता तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी समानता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटी, राजुरा द्वारा संचालित राष्ट्रीय पब्लिक स्कूल, बामणवाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमात विस्तार अधिकारी मंगला तोडे, केंद्रप्रमुख नारायण टेलकापल्लिवार, विषय तज्ञ रीता देरकर, संस्थेचे संचालक नदीम शेख, मुख्याध्यापिका प्रिशीता थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे उपस्थित होते. (rashtriya Public School)

        राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मंगला तोडे यांनी केले. यावेळी तोडे मॅडम यांनी विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय, विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व, विज्ञान प्रदर्शनातून मिळणारे फायदे, विज्ञान प्रदर्शनाची तयारी करताना मुलांना होणारा फायदा, याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनातील संकल्पना, शोध, प्रयोग आणि नवोपक्रमांचे प्रदर्शन आणि स्पष्टीकरण केले. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थी आणि व्यक्तींना गुंतवून ठेवले जाते आणि शिक्षित केले जाते तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होतो असेही त्या म्हणाल्या. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. 

        राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण इफेक्टचा शोध जाहीर केला होता. या शोधाच्या प्रसिद्ध घटनेचा शोध म्हणून हा दिवस साजरा केला जातो. असे यावेळी बोलताना संस्थेचे संचालक नदीम शेख म्हणाले. सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन शाळेचे वरिष्ठ शिक्षक वैभव तिडके यांनी केले. सदर कार्यक्रम उत्तम रित्या पूर्णत्वास नेल्याबद्दल सौ स्वाती वाघमारे यांनी शाळेतील सर्व शिक्षिकांचे सुद्धा कौतुक केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top