Yoga ; समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत योगाभ्यास पोहचवावा
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. ०२ मार्च २०२५) -
आजचे जीवन हे अतिशय धकाधकीचे व तणावपूर्ण आहे. अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणे अतिशय आवश्यक आहे. शरीर व मन स्वास्थ्यासाठी नियमित योगा करणे अतिशय गरजेचे आहे. शारीरिक मनशांती मधूनच आयुष्याचा आनंद घेता येतो. योगा हा स्वतःपुरताच मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी योगशिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पतंजली योग समितीचे महामंत्री मधुकर राजूरकर यांनी केले. राजुरा येथे केले पतंजली योग समिती च्या वतीने निशुल्क जिल्हास्तरीय योगशिक्षक प्रशिक्षण शिबिरात मधुकर राजूरकर मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला योगशिक्षक हरिदास आपटे, रेखा खामनकर, स्मिता गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योगशिक्षकांनी अनुलोम विलोम, कपालभाती, भासरिका, शशांकासान, जलनेती तसेच बाह्य प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम याचे फायदे समजावून सांगितले. काही दुर्धर आजारावर योगाचे फायदे याचे अनुभव कथन केले. अर्धंडोकेदुखी ( मायग्रेन) बी, शुगर, किडनी आजार, पोटाचे आजार, कंबरेचे दुखणे याविषयी वेगवेगळ्या प्राणायाम व योगासनाचे महत्त्व विशद केले आणि ध्यानधारणा व निद्रासनाची तासिका घेतली. योगशिक्षक मधुकर राजूरकर यांनी अतिशय सुमधुर बासरी वादन करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी जिल्हा सहसंघटक पुंडलिक उराडे, तालुका प्रभारी मुखरु सेलोटे, प्रा.दत्तात्रय मोरे, प्रा.हरिभाऊ डोर्लीकर, प्रभाकर चन्ने, अरुण जमदाडे, भावना भोयर , महिला प्रभारी सोनल चीडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तालुका प्रभारी मुखरु सेलोटे आणि आभार जिल्हा सहसंघटन मंत्री पुंडलिक उराडे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.