Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: illegal sand smuggling विहीरगावचा पाचकमानी पुलिया बनला रेती साठा करण्याचा अड्डा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
illegal sand smuggling  विहीरगावचा पाचकमानी पुलिया बनला रेती साठा करण्याचा अड्डा रेल्वेच्या नावाखाली सुरु आहे रेती तस्करीचा काळा धंदा वन विभ...
illegal sand smuggling 
विहीरगावचा पाचकमानी पुलिया बनला रेती साठा करण्याचा अड्डा
रेल्वेच्या नावाखाली सुरु आहे रेती तस्करीचा काळा धंदा
वन विभागाच्या नाल्यातून होत आहे रेती तस्करी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ मार्च २०२५) -
        विहीरगाव क्षेत्रात वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जंगल परिसरातील नाल्यातून रेतीचा अवैध उपसा करून (Vihirgaon Railway Station) विहीरगाव रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केला जात आहे. दुर्गम व जंगलव्याप्त परिसर असल्याने या रस्त्याने सहसा कोणीही जात नाही. या परिस्थितीचा फायदा घेत पांढऱ्या कारमधून एक रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करीत असल्याचे बोलले जात आहे. (Jogapur Forest)
        विहीरगांव रेल्वेच्या (Pachamani Puliya, Bodkuchi Pad) पाचकमानी पुलिया, बोडकूची पड, विहीरगांव रेल्वेचा टेलिकॉम सिग्नल ऑफिस परिसर हा अत्यंत जंगलव्याप्त भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात (Sand deposits) रेतीचे साठे केले जात आहेत. गावकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एक पांढऱ्या कारमधील रेती तस्कर जंगलातील नाले पोखरून अवैध रेती तस्करी करीत आहे. या तस्कराचा वावर नेहमी तहसील कार्यालयात दिसून येतो. वन व महसूल विभागातील काही व्यक्तींना हाताशी धरून हा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विहीरगाव रेल्वे स्टेशन अतिदुर्गम भाग असल्याने याचा फायदा तस्कर घेत आहेत.
        कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव न होता रेती येते कुठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने जनतेला कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असली तरी ती हवेत विरत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राजुरा तालुक्यात अवैध तस्करीने उच्चांक गाठला आहे. या प्रकारात अनेक दिवसांपासून बेसुमार वाढ झाली असून रात्री-अपरात्री बेधडकपणे अवैध रेतीची तस्करी केली जात आहे. गावामध्ये दलालांमार्फत रेती तस्करी सुरू असून महसूल भरायचा नसल्याने रेती माफिया गब्बर झाले आहेत. मात्र वन व महसूल विभागाचे कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालल्याशिवाय या प्रकारावर आळा बसणार नाही. (Rajura forest area) (Tehsil Office Rajura)
        (Rajura Police Station) राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेती तस्करी, कोळसा तस्करी, सट्टा पट्टी, आयपीएल सट्टा, गौ-तस्करी, झेंडा मुंडी, आणि भंगार व्यवसाय जोरात चालू होता, मात्र मध्यन्तरी प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे (IPS) यांनी अवैध धंद्यावर जबर कारवाया केल्या व त्या अजूनही सुरु असल्याने राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मात्र राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर विशेषतः रेती तस्करी जोरात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कधीही अवैध रेती वाहतुकीची वाहने नजरेस पडत नाहीत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेग खूप जास्त असल्याने सर्वसामान्य रहदारीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा ट्रॅक्टरच्या नंबर प्लेट्स बदलल्या जातात किंवा अंधुक केल्या जातात. वाढती तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे या परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. वाळूच्या ट्रॅक्टरमुळे परिसरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. संबंधित विभाग निष्क्रिय असल्याने तस्करांना आव्हान देणार तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top