Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तीन आरोपींकडून अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन आरोपींकडून अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त बल्लारपूर पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. २६ मार्च ...
तीन आरोपींकडून अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त
बल्लारपूर पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. २६ मार्च २०२५) -
        स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तीन आरोपींना अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. दिनांक २५ मार्च रोजी सपोनि मदन दिवटे आणि त्यांच्या डीबी पथकाने गस्त दरम्यान साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर येथे छापा टाकला. या कारवाईत अभि वाल्मीक साव (वय २४) दत्तनगर चंद्रपूर, विनीत नानाजी तावडे (वय २४) बापटनगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर (वय २४) राजनगर चंद्रपूर याना अटक केली. त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी कट्टा किंमत २० हजार, एक जिवंत पितळी धातूची काडतूस किंमत दोन हजार असा एकूण २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुन्हा क्रमांक २२४/२०२५ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ (१९५९) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सपोनि. मदन दिवटे आणि त्यांच्या पथकाने कामगिरी बजावली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सौरभ साळुखे, सुनिल धांडे, सफौ. आनंद परचाके, पोलीस हवालदार सुनिल कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवार कोटनाके तसेच पोलीस अंमलदार वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, कैलास चिचवलकर, अनिता नायडू आदींनी सहभाग घेतला. (Ballarpur Police Station)
26 Mar 2025

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top