Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नशीब बलवत्तर ; बसच्या धडकेत विद्यार्थिनी बचावली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नशीब बलवत्तर ; बसच्या धडकेत विद्यार्थिनी बचावली निर्माणाधीन बसस्टॅण्डवरील गैरसोयी व नियोजनशून्य कारभार आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ...
नशीब बलवत्तर ; बसच्या धडकेत विद्यार्थिनी बचावली
निर्माणाधीन बसस्टॅण्डवरील गैरसोयी व नियोजनशून्य कारभार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ मार्च २०२५)
        राजुरा शहरातील जवळपास ३० वर्षांपूर्वी बांधलेले बसस्टँड पाडत त्या ठिकाणी नवीन बस स्टँडच्या बांधकामाचे काम सुरु आहे. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे गैरसोयी सोबतच अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (rajura bus stand)

         आज दुपारच्या सुमारास (Zilla Parishad School) स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. नव्या संतोष वांढरे राहणार पंचाळा हि बस स्टॅण्डवर उभी असताना महामंडळाच्या बसने धडक देत तिला फरकटत नेले. या अपघातात तिच्या चेहऱ्याला मार लागल्याने लगेच तिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेत सीटी स्कॅन करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. नशीब बलवत्तर होते म्हणून ती थोडक्यात बचावली अन्यथा आणखी जोराची धडक बसली असती तर त्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू सुद्धा होऊ शकला असता अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
बस स्टॅन्डचे बांधकाम सुरु होताच त्यांच्या नियोजन शून्य  कारभाराकडे विद्यार्थी संघटनेने लक्ष वेधले होते. सुरक्षतेतच्या दृष्टीने बस स्टॅन्ड वर पर्यायी व्यवस्था करण्याचे निवेदनही विद्यार्थी संघटनेने लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दिले होते. बसस्टॉपच्या बांधकामादरम्यान योग्य प्रकारचे बॅरिकेड्स आणि दिशा दाखवणारे फलक (साइनबोर्ड्स) लावणे गरजेचे असताना तिथे याचा अभाव असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्ग आखणे आवश्यक असताना बस स्टँडच्या एका साईडच्या मोठ्या खुल्या जागेत पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन न केल्याने गैर सोयी होत आहे. बसेस योग्य ठिकाणी थांबाव्यात यासाठी कठोर नियम लागू करणे गरजेचे आहे. बस स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून बस आत बाहेर होतात तिथे गर्दी असल्यानेही अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे. प्रशासन आणि जबाबदार विभाग याकडे गांभीर्याने पाहतील का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.रा आहे. (Maharashtra Telangana Passengers)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top