Kazipeth-Ballarshah Passenger
राजुरा (दि. ०६ मार्च २०२५)
कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकल आणि पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता काजीपेठ-बल्लारशा-काजीपेठ ही पॅसेंजर (Kazipeth-Ballarshah Passenger) रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. (Railway) रेल्वे प्रवाश्यांची मागणी लक्षात घेत रेल्वे ने हि गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काजीपेठ बल्लारशा काजीपेठ ही रेल्वेगाडी रात्री १० वाजता काजीपेठ येथून सुटेल आणि पहाटे ३ वाजता बल्लारशा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला १५ थांबे असून गाडीचा क्रमांक १७०३५ असा राहणार आहे. यासोबतच बल्लारशा स्थानकावरून परत काजीपेठकडे वापस जाणारी गाडी पहाटे ४ वाजता सुटून रात्री ९ वाजता काजीपेठ रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि या गाडीचा क्रमांक १७०३६ असा राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणामधील प्रवाशांसाठी ही सेवा खूपच महत्त्वाची ठरेल, विशेषतः कामगार, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी. रेल्वे विभागाने घेतलेला हा निर्णय लोकांच्या मागणीला प्रतिसाद देणारा आहे. (Maharashtra Telangana Passengers)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.