आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ३१ मार्च २०२५) -
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून, येथे अनेक प्रसिद्ध खाजगी कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी कमी मिळतात. विशेषतः परप्रांतीय आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या शिफारसींवरच रोजगार दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे आदिवासी बहुल जिल्हे असून, येथील अनेक आदिवासी युवक बेरोजगार आहेत. या तरुणांना स्थानिक उद्योगांमध्ये रोजगार मिळावा, अशी मागणी आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ प्रवक्ता जितेश कुळमेथे, तसेच विदर्भ सचिव साईनाथ कोडापे यांनी आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोकराव उईके यांना आज निवेदन सादर केले. या निवेदनात, जिल्ह्यातील खाजगी कंपन्यांनी स्थानिक आदिवासी युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, तसेच त्यांना उद्योगधंद्यांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.