Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Shivjayanti - विरुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Shivjayanti - विरुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी विविध स्पर्धेत महिलांनी घेतला सहभाग आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरुर (स्टेशन) -      ...
Shivjayanti - विरुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
विविध स्पर्धेत महिलांनी घेतला सहभाग
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरुर (स्टेशन) -
        श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने विरुरात मोठया उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुंदर सजावट करून महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच अनिल आलाम, सौ.  प्रितिताई पवार तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष अविनाश रामटेके यांच्या हस्ते माल्यार्पण, दीपप्रज्वलन करत अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ विरूर स्टेशन चे अध्यक्ष तुषार मोरे यांनी ध्वजारोहण करून महाराजांना मानवंदना देत शिवगर्जना करीत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. (wirur station)

        शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व विरूर वाकिंग क्लब च्या विद्यमाने पालखी करिता विद्यार्थी व महिलांनी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात चित्रकला स्पर्धेत 1 ते 10वी पर्यंतच्या 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत एकूण तीन गटात 9 विद्यार्थ्यांना पारितोषिक व नगदी स्वरूपात रक्कम भेट देण्यात आली. 

        रॅली दरम्यान सांस्कृतिक नृत्य स्पर्धा, लेझीम नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने विरूर येथील विद्यार्थ्यांसह मोठया संख्येत महिलांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांची प्रस्तुती करून उपस्थितांची माने जिंकली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बापू धोटे व सौ.धारनेवर मॅडम यांनी काम केले. रॅलीचे समापन नंतर पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेता स्पर्धकांना शिल्ड व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर गावातील प्रमुख नागरिकासह सर्व समाजाचे अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. नंतर हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

        प्रस्ताविक प्रदीप पाला, संचालन प्रवीण चिडे तर आभार प्रदर्शन अविनाश रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तुषार मोरे, अजय रेड्डी, पावडे, विशाल जिवतोडे, प्रदीप देठे, स्वप्नील भोसकर, योगेश बक्षी, सचिन फ़टाले, सरिता रेड्डी, प्रियंका रामटेके, आशा चांदेकर, नीलिमा पावडे, सुषमा पावडे, अनुराधा चिडे, सुनंदा मोरे, रुपाली ताकसंडे यांनी परिश्रम घेतले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top