Illegal sand smuggling
अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
राजुरा पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 23 फेब्रुवारी 2025) -
वर्धा नदीचे कोलगाव घाटावरून रेतीची चोरी करुन तीन ट्रॅक्टर मौजा सास्ती गावाच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच 21 फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी 8 लाख किमतीची विना नंबरचा ट्रॅक्टर व MH34 A5050 नंबरची ठरली ट्राली, 8 लाख किमतीचा ट्रॅक्टर क्रमांक MH34 CJ6104, ट्राली क्रमांक MH34 BF9826, 8 लाख किमतीचा ट्रॅक्टर क्रमांक MH34 BV4943 ट्राली क्रमांक MH34 BV4915 तीन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करत तीन ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये असलेली अडीच ब्रास रेती अंदाजे किंमत 12,500 असा एकुण 24 लाख 12 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर चालक मिलींद अलोणे वय 32 वर्षे, महेंद्र उपरे वय 50 वर्षे, रोजकुमार मरई वय 22 वर्षे, दिलीप नरड वय 54 वर्षे, महेंद्र मरस्कोल्हे वय 34 वर्षे, रमेश येला वय 50 वर्षे यांचे विरूद्ध कलम 303 (2) भा.न्या.सं., सह कलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-1966, सहकलम - 21(1) (2) (3) गौण खनिज अधिनियम-1952, सह कलम130(1)/177, 50 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा विभाग दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे, पोनी राऊत यांच्या नेतृत्वात सपोनी नन्नावरे, पोउपनि भिष्मराज सोरते व पोलीस अंमलदार रामेश्वर चहारे, विनोद मडावी, अविनाश बांबोडे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.