Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Coal Mines Blasting वेकोलि प्रशासनाने प्रभावी उपाय योजना करावी - सरपंच निकिता रमेश झाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Coal Mines Blasting वेकोलि प्रशासनाने प्रभावी उपाय योजना करावी - सरपंच निकिता रमेश झाडे वेकोलि परिसरातील गावांना ब्लास्टिंग चे हादरे आमचा वि...
Coal Mines Blasting
वेकोलि प्रशासनाने प्रभावी उपाय योजना करावी - सरपंच निकिता रमेश झाडे
वेकोलि परिसरातील गावांना ब्लास्टिंग चे हादरे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २३ फेब्रुवारी २०२५) -
      तालुक्यातल्या सास्ती, धोपटाला, रामपूर, गोवरी, पोवनी, साखरी, माथरा, गोयेगाव या गावांमध्ये ((coal mines)) कोळसा खाणीच्या शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रचंड धुळीमुळे शेतशिवारे मातीमोल झाली आहेत, तर शालेय विद्यार्थी देखील जीव मुठीत धरून शाळेत जात आहेत. गावातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य प्रचंड ब्लास्टिंग आणि उडत असलेल्या धुरळ्यामुळं धोक्यात आलं आहे. याकरिता रामपूर गावाच्या सरपंच निकिताताई रमेश झाडे (Sarpanch Nikitatai Ramesh Zade) यांच्या नेतृत्वात (WCL Ballarpur Area) वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक (General Manager) यांना निवेदन देण्यात आले. वेकोलि ने शक्तिशाली ब्लास्टिंग (Powerful blasting) वर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास ३ मार्च पासून ब्लास्टिंग थांबविण्याचा इशारा सुद्धा दिला. (Rajura Taluka)

        बल्लारपूर क्षेत्रातील खुल्या कोळसा खाणी आसपासच्या खेड्यांसाठी शापचं ठरल्याची चर्चा आहे. तालुक्यातील सास्ती, धोपटाला, रामपूर, गोवरी, पोवनी, साखरी, माथरा, गोयेगाव गावांमध्ये कोळसा खाणीतील महाप्रचंड ब्लास्टिंग व त्यातून निघणाऱ्या धुळीने जनजीवन त्रासदायक केले आहे. खुल्या कोळसा खाणीसाठी शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहित झाल्याने शेतकऱ्यांची दैनंदिनी उद्ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर हाती पैसा आला असला तरी तो गुंतवण्यासाठी योग्य मार्गदर्शन नसल्याने या भागातील शेतकरी शांत झालाय. ज्यांच्याकडे थोडी शेती आहे त्यांना कोळसा खाणीतील ब्लास्टिंग, त्यातून निघणारी रोजची अतिप्रचंड धूळ, त्याचे पिकावर होणारे विपरीत परिणाम, नापिकी व शेवटी आत्महत्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,  उपरोक्त सर्व बाबीविषयी निवेदनातून परिसरातील व्यथा वेकोलि प्रशासनाला देण्यात आली असून ३ मार्च पासून ब्लास्टिंग थांबविण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. वेकोलि प्रशासनानेही सरपंच निकिताताई रमेश झाडे यांच्या निवेदनाची तात्काळ दाखल घेत याविषयी तातडीने उपाय योजना करण्याची ग्वाही दिली आहे. 

        निवेदन देते वेळी माजी सरपंच रमेश कुडे, उज्वल शेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष ओमप्रकाश काळे, कोमल फुसाटे, उत्तम गिरी, शिवसेना जेष्ठ नेते रमेश झाडे, अतुल खनके, सुनील नळे, मंजुषा लांडे, भाऊराव बोबडे, अमित मालेकर, कृष्णा खंडाळे, सुनील गौरकार, प्रकाश उरकुडे, सूरज गव्हाणे, दिलीप ठेंगणे, संदीप काटवले, मंगेश उरकुडे व शेकडो रामपूरवासीय व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top