Anti corruption bureau
सहायक मोटर वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला
५०० रुपयाची लाच घेणे महागात पडले
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २२ फेब्रुवारी २०२५) -
असिफाबाद ते चंद्रपूर रोडवरील लक्कडकोट गावाजवळ असलेल्या (Lakkadkot Check Post) आरटीओ चेक पोस्ट वर कार्यरत असलेले (Assistant Motor Vehicle Inspector) सहायक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते वर्ग-३, वय ३५ वर्षे व त्याचा हाताखाली कामाला असलेला खाजगी इसम जगदीश डफडे वय ३० वर्षे यास (Anti corruption bureau) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रकचालक यांच्याकडून ५०० रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करून ताब्यात घेतले आहे. याबाबत राजुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Rajura Police Station)
एका तक्रारदार ट्रकमालकचे (Complainant truck owner) ट्रक तेलंगना वरून छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये चालतात त्यामुळें आसीफाबाद ते राजुरा रोडवर लक्कडकोट गावाजवळ महाराष्ट्र आणि तेलंगना बॉर्डर वर RTO विभा चा चेक पोस्ट आहे. या चेक पोस्ट वर नेहमी त्यांचे ट्रक येत जात असतात. तेथे RTO विभाग चे अधिकारी आणि त्यांनी ठेवलेले खाजगी ऐजंट नेहमी त्यांचे गाडीचे विनाकारण कागदपत्रे पाहतात गाडीचे सर्व कागदपत्रे बरोबर असल्यावर, गाडी अंडरलोड असल्यावर, गाडीवर कोणतापण टैक्स किंवा चालान पेंडीग नसतानाही एन्ट्री फी च्या नावावर ५००/- रू लाच मागणी करत असल्याबाबत लेखी तक्रार दिली.
तक्रारीवरून दि. २१ फेब्रुवारीला लक्कडकोट येथील आरटीओ चेकनाका येथील खाजगी ईसम जगदिश आनंद डफडे यांनी पंचासमक्ष शिवाजी मच्छींद्र विभुते, सहा. मोटार वाहन निरिक्षक लक्कडकोट आरटीओ चेक नाका यांच्या उपस्थितीत तडजोडीअंती ५००/- रू. लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान खाजगी ईसम जगदिश आनंद डफडे यांनी सहायक मोटार वाहन निरिक्षक शिवाजी मच्छींद्र विभुते लक्कडकोट आरटीओ चेकनाका यांच्या उपस्थितीत तक्रारदार यांचेकडुन ५००/- रू. लाच रक्कम स्विकारली. सापळा कारवाई दरम्यान त्यांच्याकडे ५६१०० रुपये सुद्धा मिळाले. यांच्याकडे नमुद रकमेबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांनी योग्य समाधानकारक उत्तरे दिले नाही तसेच सदर रकमेबाबत कॅशबुक रजिस्टरला कोणत्याही नोंदी दिसुन आल्या नाही नसल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुध्द राजुरा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ कलम १२/७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अमरावती ला.प्र.वि. पोलीस उपअधिक्षक मंगेश मोहोड, पो.नि.केतन मांजरे, पो.नि. योगेशकुमार दंदे, युवराज राठोड, राजेश मेटकर, वैभव जायले, आशिष जांभाळे यांनी केली.
नागरिकांनी भ्रष्टाचारा संबंधी तक्रार देण्यासाठी समोर येऊन फोन नंबर ०७२१-२५५२३५५, मोबाईल क्रमांक ७०२०६९३४८१, टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर संपर्क करून भ्रष्टाचारास आळा घालावा, असे आवाहन अमरावती विभागातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.