Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Chandrapur Flying Club चंद्रपुरात उत्कृष्ट वैमानिक प्रशिक्षण केंद्र होणार - खासदार राजीव प्रताप रुडी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Chandrapur Flying Club चंद्रपुरात उत्कृष्ट वैमानिक प्रशिक्षण केंद्र होणार - खासदार राजीव प्रताप रुडी मोरवा फ्लाईंग क्लब उत्तम पायलट घडवणारे ...
Chandrapur Flying Club
चंद्रपुरात उत्कृष्ट वैमानिक प्रशिक्षण केंद्र होणार - खासदार राजीव प्रताप रुडी
मोरवा फ्लाईंग क्लब उत्तम पायलट घडवणारे केंद्र बनेल - आमदार सुधीर मुनगंटीवार 
मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २० फेब्रुवारी २०२५) -
       वैमानिक आणि फ्लाईंग हा माझा आवडीचा विषय आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळामध्ये केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री असताना देशात अनेक ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र उघडले. आज (मोरवा) चंद्रपूर मध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्टच होईल, अशी अपेक्षा खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी (Rajiv Pratap Rudy) यांनी व्यक्त केली. मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कॅप्टन ऐजिल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, पायलट प्रशिक्षक एरियल ऑरेंसन, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, सुरज पेद्दूलवार, प्रज्वलंत कडू, सर्व शासकीय अधिकारी, पायलट प्रशिक्षणार्थी, पक्ष पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

        यावेळी खासदार राजीव प्रताप रुढी म्हणाले, चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या निर्मितीमध्ये मी योगदान देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणी वैमानिक प्रशिक्षणासाठी बाहेर जातात. आपल्या जिल्ह्यातच कमीत कमी खर्चात हे प्रशिक्षण मिळावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी येथील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून हा उपक्रम मार्गी लावला. चंद्रपूरचा आदर्श महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा जाईल. भविष्यात येथे पर्यटकांसाठी एअरस्पोर्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून आदी बाबी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. येथील कॅप्टनने सर्व परवानग्या त्वरित पूर्ण कराव्यात. दोन वर्षात हे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

        ते पुढे म्हणाले, सध्या येथे ५ विमाने उपलब्ध असून, आणखी ५ विमानांची आवश्यकता आहे. यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांसाठी होस्टेल आणि अत्यावश्यक सुविधा लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. भारतात कमर्शियल पायलट प्रशिक्षणासाठी ६० ते ७० लाख रुपये, तर परदेशात जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी १ कोटी ते १.५ कोटी रुपये खर्च येतो. मात्र, चंद्रपूरमध्ये हे प्रशिक्षण तुलनेने कमी खर्चात आणि उच्च दर्जाच्या सोयींसह उपलब्ध होईल. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये हॉट एअर बलून, एअरस्पोर्ट, पॅराग्लायडिंग आदी बाबी करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

चंद्रपूर हे वैमानिकांचे चॅम्पियन केंद्र व्हावे – आमदार सुधीर मुनगंटीवार
        चंद्रपूरमध्ये श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी नवी दिशा मिळणार आहे. तसेच कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल आणि पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत, वैमानिक प्रशिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याने पुढे राहावे, यासाठी मोरवा विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. मोरवा विमानतळावर हँगर, कार्पेट रनवे आणि संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, सध्या येथे पाच विमाने उपलब्ध आहेत. लवकरच आणखी पाच विमाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे विमानतळ चांगले पायलट घडवणारे केंद्र बनेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला.

चंद्रपूरच्या विकासासाठी 'हम साथ साथ है'
        मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर फ्लाइंग क्लबच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी खासदार राजीव प्रताप रुडी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. “मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन 29 हजार 29 फूट उंचीच्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचवण्यात आले. त्यामुळे चंद्रपूरच्या तरुण-तरुणींमध्ये मोठी क्षमता आहे. भविष्यात चंद्रपूरचे विमानतळ सी फॉर चंद्रपूर आणि पायलट प्रशिक्षण क्षेत्रात सी फॉर चॅम्पियन म्हणून ओळखले जाईल. तसेच पर्यटन क्षेत्रातही विकासासाठी हॉट एअर बलून प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे.” जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 'हम साथ-साथ हैं' या भावनेतून पुढे जाण्याचा संकल्प आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांची संख्या 50 पर्यंत वाढवावी - आमदार किशोर जोरगेवार
        चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी खासदार राजीव प्रताप रुडी यांनी मान्यता दिली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. जगात वैमानिकांची मागणी वाढत आहे. चंद्रपूर हे देशाच्या मध्यस्थानी आहे. तसेच हा उद्योगांचा जिल्हा आहे. उद्योगांना चालना मिळण्यासाठी चंद्रपुरात कमर्शियल वैमानिक प्रशिक्षण केंद्रसुद्धा व्हावे. तसेच विद्यार्थी संख्या 10 वरून 50 करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Kishore Jorgewar)

        प्रास्ताविकात (Collector Vinay Gowda) जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, नागपूर फ्लाईंग क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली. सहा दशकात अनेक वैमानिक तयार झाले. (Nagpur Flying Club) नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये विमानांची आवागमन जास्त असल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे चंद्रपूरमध्ये नागपूर फ्लाईंग क्लबचा अतिरिक्त बेस तयार करण्यात येत आहे. जगात आज वैमानिकांची मागणी वाढली आहे. चंद्रपूर येथून वैमानिक तयार होतील व हे प्रशिक्षण केंद्र एक नवी उंची गाठेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते 172 आर. या प्रशिक्षण विमानाला हिरवी झेंडी दाखवून उड्डाण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार विजय पवार यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top