Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Shiv Jayanti ; राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Shiv Jayanti ; राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी आमचा विदर्भ - अनंता गोखरे, प्रतिनिधी राजुरा (दि. २० फेब्रुवारी २०२५) -   ...
Shiv Jayanti ; राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे, प्रतिनिधी
राजुरा (दि. २० फेब्रुवारी २०२५) -
       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची (Shiv Jayanti) जयंती समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या (Samanata Bahuuddeshiya Shikshan Sanstha) राष्ट्रीय पब्लिक स्कूल, बामणवाडा (National Public School, Bamanwada) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक मोहमद मेहमूद मुसा (Mohammad Mehmood Musa), अध्यक्ष नदीम शेख (Nadeem Sheikh), मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे (Swati Waghmare) आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. (Hindavi Swarajya)

        कार्यक्रमाची सुरुवात कु. कशीश मॅडम यांच्या शिवगर्जनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे, कविता आणि पोवाडे सादर केले. यावेळी मोहमद मेहमूद मुसा यांनी महाराजांच्या धाडस आणि विचारांनी प्रेरित होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देऊन स्थापन केलेले स्वराज्य जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी सर्व धर्माचा आदर केला आणि सर्व महिलांना भगिनी समान मानले, हे विचार आपल्या जीवनात अमलात आणणे आवश्यक आहे."

        संचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका कु. आकांक्षा मॅडम यांनी केले. हा उत्सव फक्त शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी नाही, तर त्यांच्या विचारांचा अभ्यास करून आपली ओळख सांगण्याचा एक अद्वितीय उपाय होता. शिवजयंतीच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या इतिहासाबद्दल, गौरवाबद्दल आणि कर्तव्याबद्दल एक विशेष जागरूकता निर्माण झाली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top