Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Railway Maldhakka ; गडचांदूर रेल्वे मालधक्का बंद करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Railway Maldhakka ; गडचांदूर रेल्वे मालधक्का बंद करण्याची मागणी कोळसा आणि जिप्समच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण आमचा विद...
Railway Maldhakka ; गडचांदूर रेल्वे मालधक्का बंद करण्याची मागणी
कोळसा आणि जिप्समच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २० फेब्रुवारी २०२५) -
        कोरपना तालुक्यातील गडचांदूर रेल्वे स्टेशन मालधक्का येथे सिमेंट उद्योगासाठी (Cement industry) लागणाऱ्या कच्च्या मालाचे लोडिंग व अनलोडिंग बंद करण्याची मागणी स्थानिक सन्मित्र ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष विजय ठाकरे (Vijay Thackeray) यांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूरच्या प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत (Gadchandur Railway Station) गडचांदूर रेल्वे स्थानकावर लोडिंग आणि अनलोडिंगमुळे वायू प्रदूषण (Pollution) होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

        ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गडचांदूर रेल्वे स्थानकावर सिमेंट उद्योगासाठी लागणारा कोळसा, जिप्सम, लेटराईड, सिमेंट या कच्च्या मालाचे लोडिंग आणि अनलोडिंग केले जात आहे.  रेल्वे स्टेशन भोवती दाट लोकवस्ती असल्याने येथील नागरिकांना प्रदूषणाचा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. या ठिकाणी ऑक्सिजन पार्क असल्याने सकाळ-संध्याकाळ फिरायला येणाऱ्या नागरिकांना धुळीमुळे त्रास होत आहे. (Maharashtra State Pollution Control Board) महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी व शर्तीनुसार याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून मालधक्का बंद करण्याची मागणी स्थानिक सन्मित्र ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top