Chandrapur Flying Club
फ्लाइंग क्लबमुळे जिल्ह्यातील तरुणांच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नांना पंख
माजी नागरी विमान वाहतूक मंत्री खा. राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते उद्या चंद्रपूरमधील फ्लाईंग क्लबचे उद्घाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ फेब्रुवारी २०२५) -
चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांतील तरुणांना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच झेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याठिकाणी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी वैमानिक होतील, तेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीचीच मान अभिमानाने उंचावणार आहे, याचा विचार आमदार मुनगंटीवार यांनी केला होता. उद्या, दि. २० फेब्रुवारी २०२५ ला दूपारी १.०० वाजता चंद्रपूर फ्लाईंग क्लबचे उद्घाटन होत आहे. (Inauguration of Chandrapur Flying Club) त्यामुळे आता आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.
हा प्रकल्प भविष्यातील वैमानिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या फ्लाईंग क्लबचे उदघाटन केंद्रिय माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, खासदार राजीव प्रताप रुडी (Former Union Minister of Civil Aviation, MP Rajeev Pratap Rudy) यांच्या हस्ते दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता मोरवा (Morwa Airport) येथे पार पडणार आहे. प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ६३ लक्ष तर संरक्षण भिंतीसाठी ११ कोटी ९३ लक्ष रुपये तातडीने मंजूर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. दिलेल्या सूचना पुर्णत्वास आल्या असून आता विमानतळ परिपूर्ण तयार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील १० प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समावेश आवर्जून करावा, अशा सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.
चंद्रपूरसाठी ऐतिहासिक पाऊल!
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरचे फ्लाईंग क्लबचे उद्धाटन होत आहे . यामुळे जिल्ह्यातील तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आ.मुनगंटीवार यांनी फ्लाईंग क्लबसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी जनतेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.