Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Krishak Spices & Agri Mart कृषक स्पाइसेस अँड अ‍ॅग्री मार्टचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Krishak Spices & Agri Mart कृषक स्पाइसेस अँड अ‍ॅग्री मार्टचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १९ ...
Krishak Spices & Agri Mart
कृषक स्पाइसेस अँड अ‍ॅग्री मार्टचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १९ फेब्रुवारी २०२५) -
        राजुरा येथे कृषक स्पाइसेस अँड अ‍ॅग्री मार्ट च्या नवीन शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी काश्मीरा सांखे, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, जिल्हा विकास अधिकारी तृणाल फुलझेले आणि तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन यांची उपस्थिती होती. 

        या अ‍ॅग्री मार्टच्या माध्यमातून ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट शुद्ध, नैसर्गिक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळतील, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल. स्थानिक पातळीवर शेती उत्पन्नाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top