Shiv Jayanti
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १९ फेब्रुवारी २०२५) -
शिव जयंती निमित्त आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा च्या वतीने संगीताचे धडे घेणाऱ्या सर्व बालकलाकारांनी तालासुरात गायन करून शिवाजी महाराजांचा गौरव आपल्या गीतातून केला. या कार्यक्रमात गौरवगाथा आपल्या निवेदनातून आरोही प्रेरित सदावर्ते हिने आपल्या दमदार शैलीतून शिवरायांच्या कर्तुत्वाचा जयघोष केला आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या केंद्रप्रमुख अलका दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला. सर्व बाल बालिका यांनी उत्तम वेशभूषेसह आपल्या कलेची सुनुक दाखवली. मुख्य गायन अलका सदावर्ते, रचना देवगडे, त्रिषा शुक्ला, आरुषी डवरे, स्वरा मारोटकर, आरोही सदावर्ते, पायल ताजणे, त्रिशा जिद्देवार, पलक टिचकुले, आद्या जंजिरा, नयन रामटेके, पूर्वा नाले, भूमी गुम्मीदी यांनी केले. पेटी वादन अलका सदावर्ते व तबलावादन लखन कुळमेथे यांनी केले. तसेच याच कार्यक्रमातून राजुरातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 28 फेब्रुवारीला मराठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. असे आयोजक व स्वर प्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी कळविले आहे. या कार्यक्रमाचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती करिता सर्व पालक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले विशेष म्हणजे स्वतंत्रकुमार शुक्ला, प्रेरित सदावर्ते, अबोली सदावर्ते, सुनिता कुंभारे, आम्रपाली नळे यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.