Maharashtra State Inter University Sports Festival
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष आग्रहामुळे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रथमच चंद्रपुरात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ फेब्रुवारी २०२५) -
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (Gondwana University Gadchiroli) यांच्या वतीने आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे (Raksha Khadse) तालुका क्रिडा संकुल, विसापूर जिल्हा चंद्रपूर येथे येत आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या आग्रहामुळे त्या प्रथमच चंद्रपूरला येत आहेत, हे विशेष. (Taluka Sports Complex, Visapur)
20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे विसापूर येथील भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यासोबतच यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील विद्यापीठ क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यभरातील खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी आहे. मिशन ऑलिम्पिक 2036 (Mission Olympics 2036) साठीही ही स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरेल. 26 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.