Sant Sevalal Maharaj's birth anniversary
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १९ फेब्रुवारी २०२५) -
सद्गुरु सेवालाल महाराज जयंती निमित्त गडचांदूर शहरात बाईक रॅली काढण्यात आली. सद्गुरु सेवालाल महाराज मंदिरासाठी घेतलेल्या जागेवर संत सेवालाल महाराज, डॉक्टर रामराव महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, काशिनाथ नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग अग्णीहवन लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्ताने इयत्ता दहावी बारावी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कारण्यात आला. सेवानिवृत्त नवनियुक्त कर्मचारी उत्कृष्ट कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमाला सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान चे अध्यक्ष हितेश चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पांडुरंग जाधव, संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, आबाजी चव्हाण, बाळू जाधव, बाबू पवार संचालक, पांडुरंग पवार संचालक, अण्णाराव आडे, एमडी चव्हाण, एच आर पवार, नामदेव जाधव, मधुकर राठोड व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक, दत्ताभाऊ शेरे प्रतिष्ठित व्यापारी गडचांदूर, बंडू राठोड, इंजिनीयर संतोष राठोड, रितेश चव्हाण वनक्षेत्र अधिकारी, वंदना राठोड व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक, यशोदा जाधव आरोग्य विभाग, पांडुरंग जाधव यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून संत सेवालाल महाराजांचे विचार, सेवालाल महाराजांचे कार्य सविस्तर विशद केले.
सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान चे कनीराम पवार यांनी संस्थांनची सविस्तर भूमिका मांडली. सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थानचे अध्यक्ष हितेश चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सद्गुरु सेवालाल महाराज मंदिरासाठी निधी कसा जमा करायचा आणि मंदिर कसे उभा राहील यावर आपले विचार प्रकट केले. सदर जयंती निमित्त कार्यक्रमात बंजारा गीत, बंजारा नृत्य सादर करण्यात आले. कुमारी काजल पवार यांनी संत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्रावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पवार सर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पवार सर यांनी केले. आभार प्रदर्शन सन्माननीय दिलीप कुमार राठोड सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव उत्तम जाधव, सहसचिव अशोक जाधव, कोषाध्यक्ष कनीराम पवार, सदस्य माधव पवार, देविदास पवार, शिवाजी राठोड, सुभाष जाधव, शंकर राठोड, उल्हास पवार, वामन जाधव, दिलीप कुमार राठोड, इंजिनिअर संतोष राठोड, कैलास पवार आणि समस्त बंजारा समाज बांधव, महिला भगिनी यांनी यशस्वी प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.