Cultural festival संघर्ष युवा विकास मंडळ द्वारे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १८ फेब्रुवारी २०२५) -
गत २४ वर्षांपासून जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, शेती, जमिन अधिग्रहण व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे ग्रामिण भागातील संघर्ष युवा विकास मंडळ, साखरी द्वारे रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उदघाटीत झालेला सांस्कृतिक समारोह संपन्न झाला. सामूहिक, एकल व ड्यूएट गटात झालेल्या या सांस्कृतिक समारोहात साखरी सोबतच राजुरा, बाखर्डी, पोवनी, गोयेगाव, वडसा येथील स्पर्धक समुहांनी सहभाग नोंदविला. (Sangharsh Yuva Vikas Mandal)
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजुरा येथील स्वरुपा झंवर, रोशनी जयस्वाल, अनुष्का रैच, पाली रैच यांची उपस्थिती होती. शेकडोंच्या संख्येत उपस्थित राहून प्रेक्षकांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
या प्रसंगी स्वरुपा झंवर यांनी ग्रामिण परिसरातील संघर्ष युवा विकास मंडळाच्या मागील २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक करीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू यांचे अभिनंदन केले व मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपक्रमांमधून कलाकाराना मंच उपलब्ध होवून त्यांच्या उपजत गुणांचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये या परिसरात मंडळाचे अमुल्य योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अतिशय मनोरंजक झालेल्या या नृत्यस्पर्धेत समुहिक नृत्य गटात प्रथम क्रमांक राजुरा येथील कोयाराणी डान्स ग्रुप, द्वितीय साखरी येथील शुभांगी डान्स ग्रुप, तृतीय ड्रीम गर्ल बाखर्डी, चतुर्थ क्रमांक जिजावू पोवनी आणि पाचवा बाखर्डी येथील डान्स ग्रुप नी पटकावला.
एकल व ड्यूएट गटात प्रथम क्रमांक वडसा येथील गुड्डू आत्राम यांनी, द्वितीय कु. स्नेहा तेलंग, तृतीय हिमानी पाणपाटे, त्रिषाली उरकुडे व वृषाली वांढरे यांना चतुर्थ आणि अवंती लांडे यांनी पाचवे क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
संचालन अमोल दरेकर, चंद्रकांत लेडांगे यांनी तर मंडळाचे सचिव अँड प्रशांत घरोटे यांनी उपस्थित सर्व डान्स ग्रुप, मान्यवर पाहुणे व प्रेक्षकांचे आभार मानले.
सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष राजु घरोटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कावळे, कोषाध्यक्ष सुदर्शन बोबडे, रामकृष्ण ताजने, आनंदराव गोरे, सुरज गोरे, अमोल गोरे, अमोल अड्बाले, मिथुन काटवलें, अनिल गोरे, राकेश उरकुडे, प्रज्वल चोथले, ज्ञानेश्वर गरूडे, राहुल उरकुडे, दुर्गेश्वर लांडे, अंकीत कावळे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.