Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Rajura Illegal Sand Mining रेती तस्करांकडून ४० लाखांचा दंड वसूल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Rajura Illegal Sand Mining रेती तस्करांकडून ४० लाखांचा दंड वसूल राजुरा महसूल प्रशासनाची अकरा महिन्यातील कारवाई १२१ ब्रास रेती साठा जप्त ; जप...
Rajura Illegal Sand Mining रेती तस्करांकडून ४० लाखांचा दंड वसूल
राजुरा महसूल प्रशासनाची अकरा महिन्यातील कारवाई
१२१ ब्रास रेती साठा जप्त ; जप्त केलेला रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना निःशुल्क वाटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १८ फेब्रुवारी २०२५) -
        जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव न झाल्याने राजुरा तालुक्यातील वर्धा नदी (Wardha River) व अनेक नाल्याचा पात्रातून जोमात रेती तस्करी जोमात केली जात आहे. (Sand mafia) रेती माफियांचे नेटवर्क जबरदस्त असल्याने पथक पोहोचण्या पूर्वीच रेती माफिया सर्व सोक्षमोक्ष लावून ठेवतात. त्यामुळे रेती तस्करांचा मुसक्या आवळणे कठीण होत असते. रेती तस्करीत कुठे मुद्दाम ढिलाई तर कुठे कडक धोरण अवलंबिले जात आहे. रेती तस्करांवर कारवाई करतांना कुणी कितीही वजनदार व्यक्ती असली तरी कायद्याचा चौकटीत त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, तेव्हाच प्रशासनाचा धाक राहील. (Rajura Revenue Department) (Sand Ghat)

        राजुरा तालुक्यात चोर मार्गाने नाले व नदीपात्रातून रेती चोरी करून नेण्याचा गोरखधंदा सुरु असल्याने तस्करांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुका प्रशासनाचा डोळ्यात धूळ झोकत रेती माफिया सक्रिय झाले आहेत. रेती तस्करी सुरु असली तरी मागील अकरा महिन्यात महसूल विभागानेही कारवाई केलेली आहे. (Tehsildar Omprakash Gond) तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांच्या मार्गदर्शनात ११ महिन्यात ३४ कारवाया करण्यात आल्या असून ४० लाख ४३ हजार ८०० रुपयांचा दंड तस्करांवर ठोठावण्यात आला आहे.

        आपल्यावर कारवाई होऊ शकते हे माहीत असतानाही रेतीची तस्करी करण्यासाठी रेती माफिया पुढे धजावत असल्याने प्रशासनाचा धाकच उरला आहे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा शहर व तालुक्यात शासकीय व खाजगी बांधकामाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रेतीची मागणी वाढली आहे. वाट्टेल ती किंमत देऊन रेती विकत घेण्याच्या घाट घातला जात आहे. रेतीच्या लिलाव न झाल्याने रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकत आड मार्गाने रेती तस्कर सक्रिय झाले आहेत. या रेती तस्करावर पाडत ठेवण्यासाठी तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी पथक निर्माण केले. वेळोवेळी या पथकांनी कारवाई करत ११ महिन्यात ३३ कारवाईत ४० लाख ४३ हजार ८०० रुपयांचा दंड तस्करांवर ठोठावला. या कारवाईत ३० ट्रॅक्टर, एक हायवा व एका ट्रकवर कारवाई करण्यात आली. यात जप्त करण्यात आलेली रेती मौजा मूर्ती येथील चार घरकुल लाभार्थ्यांना तसेच धिडशी येथील १४ घरकुल लाभार्थ्यांना अशी एकूण ३० ब्रास रेती निशुल्क देण्यात आली. चुनाळा येथे जप्त केलेली ९ ब्रास रेती मात्र चोरटयांनी चोरून नेली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली होती. असे असले तरी रेती तस्कर अजूनही थांबलेले दिसत नाही. 

मोकाट रेती तस्करांपुढे महसूल विभाग हतबल
        महसूल विभाग रेती माफियांवर कारवाई करत असताना रेती तस्करी रोखण्याकरिता गेलेल्या पथकावर जीवघेणे हल्ले झाल्याच्या बातम्या येत असतात. तसे जीवघेणे हल्ले या महसूल क्षेत्रात झाले नसले तरी असे हल्ले होणारच नाही याचीही शाश्वती नाही. शासनाने रेती घाट सुरु करून रेती तस्करीवर आला घालावा अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #illegalsand

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top