आढावा बैठकीत पत्रकारांना बोलाविण्याची पडला विसर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -
राजुरा तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी दि. ०३ फेब्रुवारीला येथील तहसील कार्यालयात तालुक्याची मॅराथॉन आढावा बैठक पार पाडली. ही बैठक दुपारी दिडच्या सुमारास सुरू होऊन रात्री पावने नऊ वाजेपर्यंत चालली. सदर बैठकीत तालुक्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा व इतर महत्त्वाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रसंगीच आगामी काळात या भागातील विकासाला गती देण्यासाठी कशाप्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील व रखडलेल्या विकासकामांचे प्रश्न मार्गी लावता येतील यासंदर्भात चर्चा झाली.
यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांची प्रश्ने सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, आपली कार्यालये अद्यावत ठेवण्यावर भर द्यावा तसेच येत्या काळात लोकसेवक म्हणून सर्वांनी तत्पर व अपडेट रहावे अशी सूचना आमदार देवराव भोंगळे यांनी दिल्या.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मुख्याधिकारी सागर मुळीक, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, वनपरिक्षत्रेधिकारी येलकेवाड, वनपरिक्षत्रेधिकारी झाडे, सर्व विभागप्रमुख, वामन तुराणकर, बाळनाथ वडस्कर, सुरेश रागीट, दिलीप गिरसावळे, सचिन डोहे, अजय राठोड, नितीन वासाडे, सिनु पांझा, यांचेसह तालुक्यातून विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
आढावा बैठकीत पत्रकारांना बोलाविण्याची पडला विसर
तालुक्यातील समस्यांची जाण असलेल्या पत्रकारांना तालुक्याचा आढावा बैठकीत बोलाविण्यात आले नसल्याने पत्रकारांत याबाबत नाराजी पसरली आहे. येथील जेष्ठ पत्रकार दैनिक भास्करचे प्रतिनिधी एम.के. सेलोटे हे तहसीलदारांना भेटण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता त्यांना आढावा बैठकीची माहिती मिळाली. त्यांचा सोबत जमील शेक पत्रकार सुद्धा होता. जेष्ठ पत्रकार सेलोटे यांनी व्हाट्सअपच्या ग्रुप मध्ये माहिती देताना सांगितले कि, ती आढावा बैठक होती कि आमदार भोंगळे साहेबांची खाजगी चर्चा बैठक होती, हे समजले नाही, तसं पाहिलं तर सर्व मान्यवर पत्रकारांना निमंत्रण द्यायचं होतं, मात्र त्यांना का बोलाविण्यात आले नाही हे समजण्यापलीकडचे आहे. पत्रकारांनीही सतर्क राहायला हवं, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एका सामान्य विषयावर आपापसात चर्चा सुरू होती, मागे काहीच ऐकू येत नव्हते, ते दोन तास बसून राहिले पण सभेचे वातावरण न आवडल्याने ते बाहेर आले त्यांच्या मागोमाग मागे बसलेले अनेक तक्रारदारही बाहेर आले.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.