एथलेटिक संघ 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -
महाराष्ट्राचा एथलेटिक संघ 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार आहे. सदर स्पर्धा भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयात भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने देहरादून, उत्तराखंड येथे 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जात आहे. महाराष्ट्र संघातील संघ व्यवस्थापक पदी चंद्रपूर जिल्ह्या एथलेटिक संघटनेच्या कोषाध्यक्ष कु. पूर्वा खेरकरची निवड करण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाने महाराष्ट्र संघ दिनांक 6 फेब्रुवारी रोजी देहरादून येथे उपस्थित होणार आहे.
स्पर्धा राष्ट्रीय स्वरूपाचे आहे आणि प्रत्येक राज्यातील मानांकित खेळाडू यांची याकरिता निवड झाली आहे. संघाचा सराव बालेवाडी पुण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सुरू आहे. प्रशिक्षक म्हणून डॉ. अतुल पाटील अमरावती, दिनेश भालेराव अहमदनगर, संजय पाटील, माधव शेजुळे परभणी, योगेश थोरबोले उस्मानाबाद, भिमाजी मोरे मुंबई आणि माधव शेजुळे परभणी असून संघ व्यवस्थापन म्हणून योगेश थोरबोले उस्मानाबाद, भिमाजी मोरे मुंबई सहभागी आहेत.
संघ राष्ट्रीय स्तरावर यशस्वीरित्या सहभागी होऊन महाराष्ट्रासाठी अधिकाधिक पदके प्राप्त करतील असे पूर्वा खेडकर यांनी म्हटले आहेत.
राज्य संघाच्या व्यवस्थापक पदावर निवड झाल्याबद्दल, चंद्रपूर जिल्हा एथलेटिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, सचिव सुरेश अडपेवार, मकरंद खाडे, प्रकाश तुमाने, प्रा. संगीता बांबोडे, रोशन भुजाडे, अनिल ददगाल, डॉ.सुनील डाखोरे, श्रीनिवास जंगम, गिरीश साकुरे, कु. वर्षा कोयचाळे, मयूर खेरकर, स्वप्निल सायंकर, भास्कर फरकाडे, चेतन भजभूजे, विजय भगत, दर्शन मासिरकर, महेश वाढई, निलेश बोधे, प्रियंका मांढरे, सरोज यादव, अविनाश जाधव, रामेश्वर फड, मारुती उरकुडे, सुरेश तूम्मे, नारायण कुडे, श्रीहरी गजक्रांती, नितेश आत्राम यांनी आनंद व्यक्त केला आणि पूर्वाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #MaharashtraAthleticAssociation #NationalSportsCompetition #IndianOlympicAssociation #GovtofIndiainDirectorateofSportsandYouthServices #purvakherkar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.